आमच्या सोबत का यावे ?
- सर्वसामान्य लोकांनी सर्वसामान्यासाठी निर्माण केलेले क्रांतिकारी व्यासपीठ म्हणजे सर प्रतिष्ठान.
- केवळ प्रश्न नव्हे उत्तर असेल तरच आम्ही प्रश्न उपस्थित करू.
- विचार मांडून बाजूला होण्यापेक्षा निवेदने, विनंती व शेवटी आंदोलन करूच.
- केवळ सामाजिक संक्रमण नव्हे, तर मानसिक बदल घडविला तरच आपण स्वराज्याकडून सुराज्याकडे जाऊ.
- पक्षीय राजकारण आम्ही करणार नाही. पण, राजकारणाला व राजकारण्यांना जमेल तिथे योग्य दिशा देण्याचा प्रयत्न नक्की करू.
- कोणत्याही धार्मिक प्रश्नावर कोणत्याही धर्माच्या बाजूने किंवा विरोधात उभे राहणे नाही.
- जो धडाडीने कार्य करेल त्यास योग्य संधी दिली जाईल, हे नक्की.
- विचार वेगळे, कृती वेगळी उत्तर मात्र सर्वाना अपेक्षित असेच असेल.
- आजवर ज्या प्रकारे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक संक्रमण झाले नाही ते आम्ही करूच.
- अनेकांना आपण तपासून पाहिले. मग आमच्यासोबतही चार पाऊले चालावे. आपली पाऊले पदयात्रा नव्हे क्रांतिकारी वाटचाल ठरतील