- गदारोळ व गोंधळ घडविण्यापेक्षा वैचारिक, वैविध्यपूर्ण, अतिआक्रमक परंतु विवेकशील पद्धतीने विविध प्रश्नांवर आंदोलन व जनजागृती करणे.
- महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर विचारमंथन करून सफल तोडगा मांडणे व त्यासाठी लढा उभारणे.
- मराठी तरुणाईच्या महत्वकांक्षा समजून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करणे व एक क्रांतिकारी विचारसरणीचा कृतीशील समूह निर्माण करणे.
- समाजकारण, राजकारण, शिक्षण क्षेत्रांतील विसंगती व चुकीचे पायंडे पुसून नवीन विकासात्मक वाट तयार करणे.
- केवळ प्रश्न मांडणे नव्हे तर उत्तरासह समाजासमोर जाणे.
- महिलासाठी ’हिरकणी महिला आघाडी’ मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे.
- बालकांसाठी सुसंस्काराचे अभिनव उपक्रम राबविणे.
- प्रखर राष्ट्रभक्तीचा परिचय देणारे राष्ट्राभिमानी युवक-युवतीना व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
- युवा विध्यार्थी एकत्रित करून प्रभावी नेतृत्व निर्माण करणे.
- सुशिक्षितांचा समाजकारण, राजकारणातील सहभाग वाढविणे.
- कर्त्यवदक्ष नागरिक, अधिकारी व समाजकारणी लोकांस पाठींबा व प्रोत्साहन देणे.
- महापुरुषांचा इतिहास जागविणे व राष्ट्रहिताचे उपक्रम राबविणे.
ध्येये व उदिष्टये

