आगामी कार्यक्रम

  • आमचे विचार जनसामान्यापर्यंत जावेत, याकरिता “मराठी जयघोष वार्ता” हे परखड विचारांचे मराठी साप्ताहिक जानेवारी २०१३ पासून प्रकाशित करीत आहोत.
  • महाविद्यालयांत दररोज राष्ट्रगीत व्हावे, हा लढा राज्यभर तीव्र करण्याचे नियोजन करीत आहोत.
  • राष्ट्रपुरुष सन्मान संरक्षण कायदा करा, महापुरुष जयंती-मिरवणुकामधून वाजविल्या जाणाऱ्या  बिभत्स फिल्मी गीतांवर बंदी घालावी, या करिता आंदोलन करणार आहोत.
  • नगरपरिषद, महापालिका, प्रशासकीय कार्यालये, महाविद्यालये आदी ठिकाणी असणाऱ्या विविध प्रश्नांवर नाविन्यपूर्ण पद्धतीने आंदोलने करून पर्याय देणार आहोत.
  • विविध क्षेत्रातील नामवंत, कीर्तिवंत, कर्मठ महिला-पुरुषांचा गौरव समारंभ वेळोवेळी घेणार आहोत.
  • प्रश्न दिसेल व लढणे योग्य वाटेल तेंव्हा लगेच कार्यक्रम ठरवून लढाईला सुरवात करणे, ही प्राथमिकता राहीलच.